IND vs PAK Final : भारताने टॉस जिंकला, हार्दिक पंड्या आऊट; रिंकू सिंहला संधी, टीम इंडियामध्ये 3 बदल
दुबई : आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणाऱ्या या ब्लॉकबस्टर सामन्याची क्रिकेटप्रेमींना प्रचंड उत्सुकता होती.कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला बॅटिंगसाठी आमंत्रण दिले. या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत.
हार्दिक पंड्या आऊट – रिंकू सिंहची एन्ट्री
टीम इंडियाला मोठा धक्का बसला असून, स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या दुखापतीमुळे अंतिम सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी स्टार फिनिशर रिंकू सिंहला संधी मिळाली आहे. तसेच जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांचे संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे हर्षित राणा आणि अर्शदीप सिंहला संघाबाहेर बसावे लागले आहे.
पाकिस्तान संघात बदल नाही
पाकिस्तानने मात्र आपल्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
भारत-पाक सामना ऐतिहासिक ठरणार
आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत. यापूर्वीच्या गट आणि सुपर-4 फेरीतील दोन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे. त्यामुळे भारताला हॅटट्रिक विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण नवव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.
प्लेइंग ईलेव्हन
भारत : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.पाकिस्तान : साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.
read also : https://ajinkyabharat.com/samadhan-shibir-citizen-miscellaneous-service-mahiti-distributed/
