“ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधानंतर PVRने भारत-पाक सामना लाईव्ह दाखवणे थांबवले”

"PVRच्या लाईव्ह स्ट्रिमिंगवर शिवसेनेचा दबाव

मुंबई  : आशिया कप २०२५ मधील भारत आणि पाकिस्तानमधील अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग महाराष्ट्रातील PVR सिनेमागृहांमध्ये होणार नाही, अशी माहिती PVRने स्पष्ट केली आहे. हा निर्णय ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या विरोधानंतर घेण्यात आला आहे.शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे पाकिस्तानसोबत सामना खेळणे किंवा दाखवणे हे देशद्रोह असून, सिंदूर उजाडलेल्या महिलांचा अपमान आहे.शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून PVRला इशारा दिला आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली कारवाई करण्याची मागणी केली. “क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र चालणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.PVRचे प्रोग्रामिंग आणि ऑपरेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष थॉमस डिसोझा यांनी शिवसेनेशी संपर्क साधून हा निर्णय स्पष्ट केला असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी माध्यमांना सांगितले.सध्या महाराष्ट्रातील PVR सिनेमागृहांमध्ये हा सामना लाईव्ह दाखवण्यात येणार नाही, मात्र इतर राज्यांमध्ये सामना पाहता येईल.

read also : https://ajinkyabharat.com/umai-gavat-juna-vad-bhadkaladak-vankhade/