जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिपी गायरानमध्ये 27 सप्टेंबर 2025 रोजी माजी मुख्याध्यापक श्री रमेश नारायण मावस्कर सर व माजी केंद्रप्रमुख श्री किशोर मधुकर कोल्हे सर यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. तसेच नव्याने रुजू झालेले श्री अनिल दामोदर काळे सर यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. नंतर सरांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व बिरसा मुंडा यांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला .समारंभात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अविनाश जावरकर, सरपंच सौ. योगिता भाऊराव पोकळे, उपसरपंच श्री संजू भाऊ गवते, पोलीस पाटील श्री रामचंद्र टन्नू भिलावेकर, उपाध्यक्ष श्री सुनील दादाराव काकडे, तसेच अनेक ग्रामस्थ, महिला भगिनी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.महत्त्वाचे: कार्यक्रमाद्वारे शाळा व गावाच्या विकासात योगदान दिलेल्या व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्यात आली.
read also:https://ajinkyabharat.com/pudhil-48-tas-ati-vrishtasathi-dhoka/
