सतत पावसामुळे कपाशी व सोयाबीन पीक धोक्यात

कर्जमाफीची मागणी जोरात”

अकोला तालुक्यातील दहिगाव, गावंडे, पळसो, बढे, गोंदापूर, रामगाव, बाहेरखेड, अन्वी, मिर्जापुर, धोतरडी या भागातील शेतकरी सततच्या पावसामुळे चिंतेत आहेत. या वर्षी ढगफुटीमुळे कपाशीचे पीक जोमात आले असले तरी बोंडाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने कापूस लागवड करण्यास अनुकूल वातावरण दिले, पण मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे कपाशी पिवळी पडून बोंड सड झाली.सोयाबीन पिकांवर येलो मौझ्याक रोग आल्यामुळे पिके पिवळी पडली आहेत.शेतकऱ्यांनी महागडे औषध फवारणीसाठी भरमसाठ खर्च केला, तरी उत्पन्न कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत.सततचा पाऊस काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण करीत आहे.

शेतकरी या परिस्थितीत राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

सचिन बडोदे, शेतकरी:“सततची अतिवृष्टीमुळे कपाशी पिकातील बोंड सडले, उत्पादन कमी होईल. सरकारने त्वरित कर्जमाफी जाहीर करावी.”

विनोद कट्यारमल, शेतकरी:“ऑगस्टमध्ये जास्त पाण्यामुळे कपाशी पिकावर कोकडा, बोंडअळी व लाल ठिपके दिसले. फुले कमी आहेत, उत्पादन हातून जात आहे. शासनाने सोयाबीन व कपाशी पीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार द्यावा.” सततच्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पीकावर मोठा फटका बसला आहे. शेतकरी उत्पन्न कमी होण्याची भीती बाळगत आहेत. या परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने कर्जमाफी ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे.

read also:https://ajinkyabharat.com/bharat-tharavato-automatically/