आशिया कप 2025 स्पर्धेत भारताचा युवा विकेटकीपर-बॅट्समन संजू सॅमसनने महेंद्रसिंह धोनीचा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील षटकारांचा विक्रम मोडला आहे. सुपर 4 फेरीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात संजूने फक्त 23 चेंडूत 39 धावा करत 3 षटकार आणि 1 चौकार ठोकला.यासह संजू सॅमसन आता टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार करणारा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. त्याच्या नावावर आता 55 षटकार आहेत, तर महेंद्रसिंह धोनीने 52 षटकार केले होते. याच क्रमवारीत ऋषभ पंतकडे 44 आणि इशान किशनकडे 36 षटकार आहेत.संजू सॅमसनने आशिया कप 2025 मध्ये सहा षटकार ठोकले आहेत. 2016 च्या आशिया कपमध्ये धोनीने चार षटकार ठोकले होते. संजू एकाच हंगामात पाच किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा एकमेव भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.या कामगिरीमुळे संजू सॅमसनवर चाहत्यांचे लक्ष केंद्रीत झाले असून, भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी सामने अधिक उत्सुकतेने पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/trolley-crop/
