आशिया कप 2025: भारत-पाकिस्तान महाअंतिम सामना आज दुबईत

भारत-पाकिस्तान महाअंतिम सामना

रात्री ८ वाजता होणार पहिली चेंडूची उधळण, टॉस ७.३० वाजता

आशिया कप 2025 स्पर्धेत सलग सहा विजय मिळवत टीम इंडियाने अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला आहे.आज,रविवारी (28 सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान या चिरप्रतिस्पर्ध्यांमध्ये महाअंतिम सामना रंगणार आहे. आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान अंतिम फेरीत आमनेसामने येणार असल्याने या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.टीम इंडिया या स्पर्धेत पाकिस्तानवर आधीच दोनदा मात करत आघाडीवर आहे. साखळी फेरी आणि सुपर-4 मध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत करत मानसिक आघाडी मिळवली आहे. मात्र,अंतिम सामन्यात परिस्थिती बदलू शकते, त्यामुळे झुंज चुरशीची होण्याची दाट शक्यता आहे.

सामना कधी आणि कुठे ?

कुठे पाहता येणार सामना?

  • टीव्हीवर : सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्स

  • मोबाईलवर : Sony LIV ॲपवर थेट प्रक्षेपण

भारत सर्वात यशस्वी संघ

आशिया कपच्या इतिहासात भारत हा सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. याआधीच्या 16 स्पर्धांपैकी तब्बल 8 वेळा भारताने विजेतेपद पटकावले आहे. गतविजेता असलेल्या भारताकडे आज नवव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला केवळ दोन वेळा आशिया कप जिंकता आला आहे. 2012 नंतर पाकिस्तानच्या झोळीत विजेतेपद आलेले नाही. त्यामुळे 13 वर्षांची प्रतिक्षा संपवण्याचे मोठे आव्हान पाकिस्तानपुढे आहे.आजचा सामना केवळ विजेतेपदासाठीच नाही, तर इतिहास घडवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. क्रिकेटप्रेमींसाठी हा खऱ्या अर्थाने ‘सुपर संडे’ ठरणार आहे.

read also : https://ajinkyabharat.com/collective-thinking-shape-prophet/

Related News