जय बजरंग कला महाविद्यालय चान्नी येथे ‘एन.ई.पी २०२०’ वर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.
चान्नी- स्थानिक जय बजरंग युवक मंडळ द्वारा संचालित जय बजरंग कला महाविद्यालयात ‘एन.ई.पी. २०२० -राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रवास पाच वर्षाचा, सामूहिक चिंतन – आकार भविष्याचा’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि जय बजरंग कला महाविद्यालय चान्नी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच संपन्न झाली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. निवृत्ती वरखेडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्त्या म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी भाषा तथा वाणिज्य भाषा अभ्यास मंडळाच्या माजी अध्यक्षा प्रोफेसर डॉ.ममता इंगोले, तथा मराठी विभाग प्रमुख डॉ.एच.एन.सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय पातुर,तसेच संस्थेचे सचिव गजानन इंगळे हे व्यासपीठावर उपस्थित होते.सत्र २०२४- २५ पासून पदवी स्तरावरील प्रथम वर्षासाठी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू झालेले आहे; पण या धोरणासंबंधी मात्र शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये कमालीची साशंकता असून ती दूर करण्याच्या उद्देशाने प्रामुख्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आपले व्याख्यान देताना डॉ.ममता इंगोले यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यांची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी आपले मत व्यक्त करताना डॉ.ममता इंगोलें यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०चे ध्येय, उद्दिष्टे, प्रत्यक्ष धोरण आणि त्याची अंमलबजावणी या चारही मुद्द्यावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचे माध्यमातून प्रकाश टाकला. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या विषय आणि शाखाबाह्य विषय निवडीचे असणारे स्वातंत्र्य,पदवीच्या प्रत्येक स्तरावर मूल्यांकन पद्धती, अन्तर्गत गुणदानाचे आधार,कार्यानुभव, क्रेडिट्स वितरणाचे आधार यावर प्रकाश टाकला.तीन वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमांत विद्यार्थ्याने किती क्रेडिट्स मिळविले पाहिजे याची माहिती त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचे माध्यमातून दिली. कौशल्यप्रधान, रोजगाराभिमुख आणि आर्थिक दृष्टया स्वावलंबी विद्यार्थी निर्माण करणे हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०चा प्रमुख हेतू आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. या धोरणानुसार हे शिक्षण अध्ययन युक्त आहे,अध्यापन युक्त नाही म्हणून विद्यार्थ्याने स्वयं अध्ययनासाठी स्वतःची जिज्ञासा वाढवण्याची अत्यंत गरज आहे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. हे धोरण सध्या संक्रमण अवस्थेमध्ये असल्यामुळे या संदर्भामध्ये अजून बऱ्याच बाबी अस्पष्ट स्वरूपात असून प्रत्यक्ष अंमलबजावणी करीत असताना येणाऱ्या अडचणीवर उपाययोजना करता येतील असेही त्यांनी याप्रसंगी नमूद केले.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी प्रा.डॉ.ममता इंगोले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या शंकांचे निरसन केले.संस्थेचे सचिव गजानन इंगळे यांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थी महाविद्यालयाशी जेवढे एकरूप होतील तेवढे त्याचे व्यक्तिमत्व फुलेल व हे धोरण यशस्वी होईल म्हणून महाविद्यालयाशी एकरूप होण्याचे,नियमीत उपस्थित राहण्याचे आवाहन केले.अध्यक्षीय मनोगतात व्याख्यानाचे माध्यमातूनच अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल प्राचार्य प्रा.निवृत्ती वरखेडे यांनी प्रा.डॉ. ममता इंगोले यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. केंद्रीय स्तरावर या शैक्षणिक धोरणाला सुरुवात होऊन पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या धोरणाचा एक आढावा घेण्याच्या व विद्यार्थी आणि शिक्षक यांना अवगत करण्याचे दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे प्राचार्यांनी नमूद केले.एक देश- एक शिक्षण प्रणाली या तत्त्वावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उभारणी करण्यात आलेली असून त्यासाठी याची अंमलबजावणी व्यवस्थित होण्याची गरज आहे. विद्यार्थी जेव्हा आपले एक शैक्षणिक पर्व पूर्ण करेल तेव्हाच या धोरणाचे परिणाम पुढे येतील पण त्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व्यवस्थित राबवण्याची अत्यंत गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.कार्यक्रमाचे अत्यंत समर्पक असे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ.निलेश सोनोने राज्यशास्त्र विभागप्रमुख यांनी मानले.कार्यक्रमाला प्रा.गजानन गाडगे,प्रा.गणेश कालापाड ,संजय जायभाये,संजय गोपनारायण ,भालेराव ,वसंत ढोकणे,सातव व मोठ्या संख्येने विद्यार्थी तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
read also :https://ajinkyabharat.com/state-womens-commission-kadak-pest/
