अकोला : अकोला रेल्वे स्थानक परिसरात ‘स्वच्छता राज्य सेवा पंधरवडा’ अंतर्गत उत्साहात स्वच्छता श्रमदान मोहीम राबविण्यात आली.

शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबवला जात असून, अकोला रेल्वे प्रशासनाच्या वतीने गुरुवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी आयोजित या मोहिमेत प्रसिध्द उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुगत वाघमारे यांच्या मार्गदर्शनात तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीने सक्रिय सहभाग घेत स्थानक परिसर स्वच्छ केला.

यामध्ये आरपीएफ आणि जीआरपीएफचे कर्मचारीही सहभागी होते.या उपक्रमात अकोला रेल्वे स्टेशन प्रबंधक एस. डी. कवळे, मुख्य स्वास्थ्य निरीक्षक शिवकुमार माली, मुख्य वाणिज्य निरीक्षक बी. डी. राऊत, तिक्ष्णगत वेल्फ अर सोसायटीचे सचिव विष्णुदास मोंडोकार, जिल्हा समन्वयक सचिन पाटील, मार्गदर्शक अश्विन शिरसाट, विशाल शिंदे, निलेश ठोकळे, बॉबी पळसपगार यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

अकोला रेल्वे स्थानक प्रबंधक एस. डी. कवळे यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन करत सांगितले की, स्वच्छता ही केवळ जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. सदैव स्वच्छतेसाठी जागरूक राहा आणि हा संदेश आपल्या कुटुंब व समाजापर्यंत पोहचवा.स्वच्छता ही सेवा 2025 कार्यक्रमात रेल्वे इलेक्ट्रिशन विभागाचे मेंबर रामनारायण मिश्रा, स्टेशन विद्युत कर्मचारी, आरपीएफ व जीआरपीएफ स्टाफ, तसेच तिक्ष्णगत सदस्य उमेश शिरसाट, श्वेता शिरसाट, सुचिता घोगरे, सपना म्हात्रे, यशवंत साळवे, करण पळसपगार, भिमराज शिरसाट, अंकुश शिरसाट यांनी हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला.तिक्ष्णगत वेल्फेअर सोसायटीचे सचिव विष्णुदास मोंडोकार यांनी सांगितले, एक दिवस, एक तास, एकत्र येऊन केलेले श्रमदान स्वच्छतेच्या संस्कृतीला चालना देते. प्रत्येक नागरिकाने या मोहिमेतून प्रेरणा घ्यावी. यावेळी उपस्थितांनी या प्रेरणादायी श्रमदानाचे भरभरून कौतुक केले, रेल्वे प्रशासन, आरपीएफ व जीआरपीएफ स्टाफ, तसेच तिक्ष्णगत सोसायटीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आणि कार्यकर्त्यांनी हा उपक्रम सतत चालवण्याची तयारी व्यक्त केली. हा उपक्रम फक्त परिसर स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता, समाजातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश पोहचवणारा ठरला.
read also : https://ajinkyabharat.com/state-womens-commission-kadak-pest/
