“एक पेड माँ के नाम”

कडून पाचवी माळ निसर्गाला अर्पण

पातूर नंदापूर :सरस्वती विद्या मंदिर स्कूलमध्ये ‘पाचवी माळ निसर्गाला अर्पण’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हिरवा रंग हा निसर्गाचा प्रतीक असल्याने आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो, या अनुषंगाने विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.या वेळी मुलांनी नाट्यप्रयोग सादर करून फळभाज्या व पालेभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व समजावून दिले. तसेच “झाडे लावा, झाडे जगवा” आणि “एक पेड माँ के नाम” या प्रभावी घोषणांद्वारे निसर्गाचा समतोल राखण्याचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड करून झाडांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. पर्यावरणाचे महत्त्व जाणून पुढील पिढीसाठी हिरवेगार भविष्य घडविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.हा उपक्रम संस्थेच्या संचालिका सौ. रूपाली सतीश उभे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सौ. प्रिया ठाकरे, कांचन गावंडे, भावना राऊत, तेजस्विनी इंगळे, मुक्ता आटेकर, प्रांजली देशमुख, संगीता बोळे व राधेश्याम राठोड यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.“वृक्ष केवळ छाया, फळे व ऑक्सिजनच देत नाहीत, तर जीवन जगण्याची खरी शक्ती देतात. प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवावे,” असे मत संस्थेचे सचिव सतीश उभे यांनी व्यक्त केले.या उपक्रमातून परिसरात वृक्षसंख्या वाढविणे व पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

read also : https://ajinkyabharat.com/maharashtra-nagari-seva-gazetted-joint-east-examination-date-change/