सूर्यकुमार यादववर कारवाईची शक्यता !

पण अंतिम सामन्यात खेळणारच !

Ind Vs Pak Asia Cup Final : भारत-पाक फायनलपूर्वी टीम इंडियाला झटका? 

मुंबई | 26 सप्टेंबर 2025 – आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान ही पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. येत्या रविवारी होणाऱ्या या रोमहर्षक लढतीपूर्वी टीम इंडियासाठी एक मोठी चर्चा रंगली आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी तो अंतिम सामन्यात खेळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

 काय आहे प्रकरण?

14 सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली होती. या वक्तव्यावर पाकिस्तानकडून आक्षेप घेण्यात आला होता. पाक क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे अधिकृत तक्रार नोंदवली होती. तसेच नाणेफेकीच्या वेळी सूर्यकुमारने पाक कर्णधार सलमान आगा याच्याशी हस्तांदोलन न केल्याने वाद वाढला.

Related News

 ICC ची कारवाई

आयसीसीच्या समितीने चौकशी करून सूर्यकुमार यादवला ताकीद (Warning) दिली आहे. मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांच्या नेतृत्वाखाली चौकशी झाली. बीसीसीआयचे सीओ हेमंग अमीन आणि अधिकारी सुमीत मल्लापुरकर हे देखील उपस्थित होते.आयसीसीच्या नियमानुसार ही कृती पहिल्या स्तराचे उल्लंघन असल्याने, यासाठी खेळाडूला निलंबित केले जात नाही. फक्त आर्थिक दंड किंवा डिमेरिट पॉइंट्स दिले जातात. त्यामुळे सूर्यकुमार यादवला फायनलमध्ये खेळण्यास अडथळा नाही.

 सूर्यकुमार यादवचं वक्तव्य

“पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. हा विजय आम्ही आपल्या शूरवीर सैन्यदलाला समर्पित करतो,” असे सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर सांगितले होते.

 फायनलचा थरार

आता सर्वांचे लक्ष रविवारी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल कडे लागले आहे. या स्पर्धेत हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येणार असून, अंतिम लढतीत कोण बाजी मारणार याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

 सामना: भारत vs पाकिस्तान
 स्पर्धा: आशिया कप 2025 फायनल
 तारीख: रविवार
 स्थळ: कोलंबो

read also : https://ajinkyabharat.com/aranitil-overcrowded-outrage-jilahadhiyachayacharya-dauyamagachanthe-outcry-of-flood-affected-people-in-arni/

Related News