दुबई : टी 20 आय आशिया कप २०२५ स्पर्धेतील सुपर 4 मधील १७ वा सामना, पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, अंतिम फेरीत पोहचण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २ पैकी १ सामना जिंकला असून, हा सामनाच अंतिम फेरीतील दुसऱ्या जागेसाठी निर्णायक ठरणार आहे.भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामना सुरू होणार आहे. टॉस सुमारे ७:३० वाजता झाला आणि बांगलादेशने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेत पाकिस्तानला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. हंगामी कर्णधार झाकेर अली यांनी लिटन दासच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व केले.
प्लेइंग ईलेव्हन
पाकिस्तान: साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आघा (कॅप्टन), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद.पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही.
बांगलादेश: सैफ हसन, परवेझ हुसेन इमॉन, तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, झाकेर अली (कॅप्टन आणि विकेटकीपर), नुरुल हसन, महेदी हसन, रिशाद हुसेन, तास्किन अहमद, तंजीद हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.बांगलादेशने टीम इंडिया विरुद्ध सामन्यानंतर तीन बदल केले असून, ताजी ऊर्जा आणण्यासाठी नुरुल हसन, तास्किन अहमद आणि महेदी हसन यांना संधी दिली आहे.
सामना निर्णायक
दोन्ही संघांमध्ये टक्कर प्रचंड असणार आहे, कारण हा सामना जिंकल्यानंतरच अंतिम फेरीत टीम इंडिया विरुद्ध भारताचा सामना ठरणार आहे. क्रिकेट चाहत्यांचे लक्ष पाकिस्तान किती धावांवर थांबवेल, याकडे लागलेले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/poor-affected-student-mental-system/
