72 वर्षीय महिलेला लुटणारा गजाआड

नागपूर : सोनसाखळी चोरट्यास 36 तासात अटक ,150 सीसीटीव्ही तपासून केली आरोपीला अटक झाली आहे .नागपूरच्या धंतोली परिसरातील इंद्र सरिता अपार्टमेंट  मध्ये राहणाऱ्या लता झंवर ही 72 वर्षीय महिला नियमित योग्य अभ्यास करून धंतोली गार्डन परिसरातून घराकडे येत असताना चेहऱ्याला कापड लावून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन साखळी ओढुन नेली या दरम्यान फिर्यादी महिलेने आरडाओरड केला मात्र चोरटा तेथून पसार झाला तात्काळ या घटनेची माहिती फिर्यादी लता झंवर यांनी धंतोली पोलिसांना दिली आणि धंतोली पोलिसांनी डीबी पथकाच्या माध्यमातून साधारण 36 तासात चोरट्यास मुद्देमालासह अटक केली यावेळी पोलिसांनी परिसरातील 150 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासून सोनसाखळी चोरटा निखिल ठाकरे यास अटक केली आहे आणि त्याच्याकडून सात ग्रॅम सोन्याच्या चैन असा मुद्देमाल धंतोली पोलीस आणि जप्त केला आहे.

read also : https://ajinkyabharat.com/japa-shahemadhyay-newly-elected-teacher-hospitality/