कारंजा (लाड) – नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारंजा आगार प्रशासनाने भाविकांसाठी विशेष बससेवा सुरू केली आहे. माहूर येथील प्रसिद्ध श्री रेणुकामातेच्या दर्शनासाठी कारंजा आगारातून थेट बस फेऱ्या सुरू झाल्या आहेत. या निर्णयामुळे भाविकांना प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे, तसेच गर्दीच्या काळात सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
बस सुटण्याच्या वेळा व मार्ग
पहिली बस: सकाळी ७.४५ वा., मार्ग: मानोरा – दिग्रस – पोहरादेवी – आर्णी – माहूर, आगमन: १०.४५ वा.
दुपारी बस: २.०० वा.
संध्याकाळी बस: ५.०० वा.
माहूरहून परतीच्या फेऱ्या
सकाळी ११.०० वा.
दुपारी १.३० वा.
संध्याकाळी ५.१५ वा.
रात्री ८.०० वा.
माहूरच्या नवरात्र उत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. अशा गर्दीच्या काळात कारंजा आगारातून थेट बस फेऱ्या सुरू केल्याने प्रवाशांना प्रवासात होणारा त्रास टळणार आहे. या बससेवांमुळे भाविकांना वेळेत, सुरक्षित व किफायतशीर प्रवासाचा लाभ मिळेल.कारंजा आगार प्रशासनाने आवाहन केले आहे की प्रवाशांनी या विशेष सेवांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा. तसेच, प्रवाशांचा प्रतिसाद समाधानकारक राहिला आणि उत्पन्न नियमित वाढले, तर भविष्यात या फेऱ्या कायमस्वरूपी सुरू करण्याचा विचार करण्यात येणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/today-shewatcha-day-450-cotchie/
