आज शेवटचा दिवस, 450 कोटींची उभारणी

450 कोटींचा जारो आयपीओ आज बंद होणार : तुम्ही सहभागी व्हाल का?

जारो इन्स्टिट्यूट आयपीओ

पुणे : जारो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीजचा आयपीओ आज, 25 सप्टेंबरला, शेवटच्या दिवशी सबस्क्राईब केला जाऊ शकतो. हा आयपीओ 23 सप्टेंबरपासून सुरू झाला होता.कंपनी आयपीओद्वारे एकूण 450 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे, त्यापैकी 170 कोटी रुपयांचे नवीन शेअर जारी केले जातील आणि 280 कोटी रुपयांची ऑफर फॉर सेलद्वारे विक्री होईल. प्रमोटर संजय नामदेव साळुंखे यांचा कंपनीतील हिस्सा 78.2 टक्के असून, ऑफर फॉर सेलद्वारे ते 400 कोटींच्या शेअरची विक्री करून हिस्सा कमी करणार आहेत.नवीन शेअरच्या विक्रीतून मिळणारी रक्कम कर्ज परतफेड, मार्केटिंग, ब्रँड बिल्डिंग आणि जाहिरातीसाठी वापरण्यात येईल.जारो आयपीओची किंमत पट्टा 846 ते 890 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आला आहे. एका लॉटमध्ये 16 शेअर असून, एका लॉटसाठी गुंतवणूक 14,240 रुपये आहे. आयपीओ अलॉटमेंट 26 सप्टेंबरला होईल, डीमॅट खात्यात 29 सप्टेंबरला शेअर्स जमा होतील आणि 30 सप्टेंबरला BSE व NSE वर लिस्टिंग होईल.

GMP (Grey Market Premium) सध्या 961 रुपये आहे.

कंपनी माहिती: जारो एज्युकेशनची स्थापना 2009 मध्ये संजय साळुंखे यांनी केली. कंपनी तंत्रज्ञान केंद्रीत डिग्री आणि प्रमाणपत्र कोर्सेस पुरवते. भारतातील 22 प्रमुख शहरांमध्ये कंपनीची कार्यालये आहेत आणि IIM मध्ये 15 स्टुडिओज कार्यरत आहेत.

(टीप: शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक जोखमीच्या अधीन असतात. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

read also : https://ajinkyabharat.com/wifeless-death-accused-pati-polis-kotdit/