हार्दिकबाबत रोहित शर्माचं मोठं वक्तव्य

रोहित शर्मा

रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यात विस्तवही जात नसल्याचे सध्या म्हटले जात आहे.

कारण मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून या दोघांमध्ये चांगलाच वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहेत.

त्यामुळे भारताचा टी-२० संघ निवडताना रोहित आपला राग काढून हार्दिकला संघाबाहेर ठेवेल, असे म्हटले जात होते. पण रोहितने तसं केलं नाही.

Related News

आता रोहितने हार्दिकबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाच जेतेपदं मिळवून दिली असली तरी मुंबई इंडियन्सने अखेर त्याला कर्णधारपदावरून काढले.

हार्दिकला त्यांनी संघाचे नेतृत्व दिले आणि त्यानंतर ते ट्रोल झाले. कारण हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाची कामगिरी चांगली झालेली नाही.

आणि त्यामुळेच मुंबईचा संघ आता आयपीएल स्पर्धेच्या बाहेर पडू शकतो, असे चित्र निर्माण झाले आहे. पण त्यानंतरही रोहित कधीच काही बोलला नव्हता.

पण अखेर रोहित आणि भारतीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी हार्दिकबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

हार्दिकच्या प्रश्नावर अखेर आगरकर यांनी सांगितले की, ” हार्दिक हा फार मोठ्या कालावधीनंतर परतला आहे.

त्यानंतर मुंबई इंडियन्सकडून तो सर्व सामने खेळला आहे. टी-२० वर्ल्ड कपला अजूनही एका महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे या महिन्याभरात हार्दिक चांगल्या फॉर्मात येईल, अशी आम्हाला आशा आहे.

हार्दिक पंड्या हा संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे, त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही.

हार्दिकच्या फक्त फिटनेसचा विषय असून शकतो, पण त्याच्या गुणवत्तेबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही.”

हार्दिकबाबत रोहित शर्मा म्हणाला की, ” प्रत्येक संघात अष्टपैलू खेळाडूंची एक महत्वाची भूमिका असते.

माझ्यामते हार्दिक हा एक असा खेळाडू आहे की, तो कोणत्याही क्षणी संघासाठी गोलंदाजी करू शकतो आणि त्याने ते करूनही दाखवले आहे. त्यामुळेच अष्टपैलू खेळाडूची भूमिका तो योग्यपणे बजावताना दिसतो.

या संघात हार्दिकबरोबर शिवम दुबेचीही निवड केली आहे. पण शिवमने आतापर्यंत आयपीएलमध्ये जास्त गोलंदाजी केलेली नाही.

पण तोदेखील हार्दिकसारखाच संघाच्या मदतीला कधीही येऊ शकतो.”

रोहित शर्माने यावेळी हार्दिच्या गुणवत्तेवर आपले मत व्यक्त केले आहे. रोहित आणि हार्दिक यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.

पण रोहितने मात्र ही गोष्ट कधीच सर्वांसमोर आणली नाही आणि त्यामुळे तो एक जंटलमन क्रिकेटपटू ठरतो.

त्यामुळे आता वर्ल्ड कपमध्ये हार्दिक आणि शिवम यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Related News