अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विरुद्ध पोस्कोनुसार गुन्हा दाखल

कारंजा तालुक्यातील भयंकर घटना: पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल"

कारंजा (लाड) :-कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथे १५ वर्षीय मुलगी एकटी घरी असताना काजळेश्वर येथील आरोपी शंकर वसंता वाडकर(३२) याने घरात जबरदस्तीने प्रवेश करून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची घटना २३ सप्टेबरच्या सकाळी ११ वाजता घडली.ह्या घटनेची तक्रार पीडित मुलीने २४ सफ्टेबर रोजी कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनला दिल्यावरून आरोपी विरुद्ध कलम ३३,६४(२)(I),६५(१) बीएनएस सहकलम ४,६ पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार फीर्यादी ही घरी एकटीच हजर असताना अंदाजे ११ वाजताच्या दरम्यान आरोपीने फिर्यादीस समिक्षा आहे का घरी असा आवाज दिला तेव्हा फिर्यादी ने दाराकडे बघतले तर आरोपी शंकर दता वाडकर हा तिच्या घराचे आत दाराजवळ उभा दिसला तेव्हा फीर्यादी ने आरोपीस म्हणाली की काय काम आहे तेव्हा तो काही बोलला नाही, “त्याने पीडित मुलीला पकडून दिवानवर ढकलले. पीडिताने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.”. फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा दाखल करून पुढील तपास पो.उपनिरीक्षक  रामेश्वर रामचवरे  करीत आहे

read also : http://ajinkyabharat.com/umbardabajarat-awadhut-maharajanchi-grand-journey-concluded/