विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
पातूर : आयुष मंत्रालयाच्या वतीने देशभरात आयोजित आयुर्वेद दिन कार्यक्रमानिमित्त पाटूर येथील आमदार डॉ. राहुल पाटील शैक्षणिक संकुलातील डॉ. वंदनाताई जगन्नाथराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयात आयुर्वेद सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या आठवड्यात नागरिकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आहार प्रदर्शनी, लठ्ठपणावरील उपाययोजना मार्गदर्शन, ऋतुचर्या व व्याधीनिराकरणावर व्याख्यान (वनस्पती शास्त्र व द्रव्य गुण विभाग), भव्य रोगनिदान शिबिर (तहसील कार्यालय, पाटूर येथे – सुमारे २०० रुग्ण सहभागी), प्रकृती परीक्षण (शरीरक्रिया विभाग), योगा व ध्यान सत्र, औषधी वनस्पती व औषधनिर्मितीविषयी माहिती अशा विविध उपक्रमांनी आयुर्वेद सप्ताह रंगतदार झाला. आठवड्याचा समारोप भव्य रॅलीने करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे संचालक डॉ. साजिद शेख यांच्या हस्ते झाले. या वेळी नोडल ऑफिसर डॉ. शैलेश पुंड यांनी विशेष भूमिका बजावली.कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. जयश्री काटोले, उपप्राचार्य डॉ. अभय भुस्कडे, तसेच डॉ. सुनिता कदम, डॉ. गायत्री मावळे, डॉ. नितीन शेंडे, डॉ. नितीन टाले, डॉ. आशिष केचे, डॉ. सोनाली महाजन, डॉ. अश्विनी दिंडोकार, डॉ. अश्विनी वहिले, डॉ. प्रवीण वक्ते, डॉ. विजय कवडे, डॉ. ऋतुराज मोरे, डॉ. ऋषिकेश अंधारे, डॉ. संगीता विधळे, डॉ. बोळे यांच्यासह सर्व शिक्षक, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“आयुर्वेद जन के लिए, पृथ्वी के कल्याण के लिए” या घोषवाक्याखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला, अशी माहिती नोडल ऑफिसर डॉ. शैलेश पुंड यांनी दिली.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/deaths-of-death-would-be-balpanatcha-jhali/
