वयाच्या ८८व्या धर्मेंद्र यांनी बांधली पुन्हा हेमा मालिनी यांच्याशी लग्नगाठ

मुंबई- हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची जोडी बॉलिवूडच्या पडद्यावरसुद्धा आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा लोकप्रिय आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा गुरुवारी ४४वा लग्नाचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने हेमा यांनी त्यांचे काही फोटो शेअर केले असून ‘अवर ऍनिव्हर्सरी फोटो’ असं कॅप्शन त्या फोटोला दिलंय. हे फोटो याहून दोघांनी पुन्हा लग्न केलं की काय? असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केलाय.

पुन्हा लग्न?

हेमा यांनी तीन फोटो शेअर केले असून एका फोटोमध्ये दोघांनी वरमाला घातल्याचं दिसतंय. दुसऱ्या फोटोत धर्मेंद्र, हेमा यांना किस करताना दिसतायत तर तिसऱ्या फोटोत त्यांची मुलगी ईशा देओल सुद्धा दिसतेय. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

दोघांची लव्ह स्टोरी

हेमा आणि धर्मेंद्र यांची लव्ह स्टोरी खूप गाजली. के. ए. अब्बास यांच्या चित्रपटाच्या प्रिमिअरदरम्यान दोघांची ओळख भेट झाली. चित्रपटाच्या प्रिमिअरदरम्यान हेमा यांना रंगमंचावर बोलावण्यात आलं तेव्हा धर्मेंद्र यांनी पहिल्यांदा हेमा मालिनी यांना पाहिलं आणि ते त्यांच्या प्रेमात पडले.

Related News

रिपोर्टनुसार, ‘प्रतिज्ञा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हेमा, धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या. मात्र, धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं त्यामुळे हेमा यांच्या वडिलांनी विरोध केला. परंतु, कुटुंबियांच्या विरोधात जाऊन १९८० मध्ये हेमा यांनी धर्मेंद यांच्यासोबत लग्न केलं.

दरम्यान, धर्मेंद्र अजूनही अभिनयक्षेत्रात कार्यरत असून करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांच्या ”तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात सुद्धा धर्मेंद्र यांनी काम केलंय.

हेमा मालिनी यांच्याबद्दल सांगायचं तर त्या सध्या राजकारणात सक्रीय असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील मथुरा येथील भाजपाच्या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे.

Related News