मुंबई :वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शुबमन गिल पहिल्यांदाच मायदेशात कर्णधारपदाची धुरा सांभाळणार असून, त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. रवींद्र जाडेजा याला उपकर्णधार करण्यात आलं आहे.करुण नायर, साई सुदर्शन आणि आकाशदीप यांना टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.सरफराज खानलाही संधी मिळालेली नाही.देवदत्त पडिक्कलने पुनरागमन केलं असून, अक्षर पटेललाही टीममध्ये परत स्थान मिळालं आहे. दुखापतीमुळे ऋषभ पंत अजूनही फिट नसल्याने नारायण जगदीशन याला संघात स्थान देण्यात आलं आहे. शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नीतीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव आणि नारायण जगदीशन. केवरॉन एंडरसन, एलिक अथानाजे, जॉन कॅम्पबल, तेगनारायण चंद्रपॉल, शे होप, टेविन इमलाच, ब्रँडन किंग, रॉस्टन चेज़ (कॅप्टन), जस्टिन ग्रीव्स, खारे पियरे, जॉन वॉरिकन, अल्जारी जोसफ, शेमार जोसफ, एंडरसन फिलिप आणि जेडन सील्स.
एकूण कसोटी सामने : 100
भारत विजय : 23
वेस्ट इंडिज विजय : 30
अनिर्णीत : 47
भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध सलग 9 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. वेस्ट इंडिजने भारतात शेवटची कसोटी मालिका 2002 मध्ये जिंकली होती. मागील पाच वर्षांत भारताने वेस्ट इंडिजवर क्लीन स्वीप केला
पहिली कसोटी : 2 ऑक्टोबर, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
दुसरी कसोटी : 10 ऑक्टोबर, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
read also:https://ajinkyabharat.com/celebritychya-vadhatya-maganya/
