जळगाव : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदी सातत्याने वाढत होते, ज्यामुळे ग्राहकांचा हिरमोड उडाला होता. मात्र, 25 सप्टेंबर रोजी जळगाव सराफा बाजारात दोन्ही धातुंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.
सोन्याचा भाव:
24 कॅरेट सोने: ₹1,13,230 प्रति 10 ग्रॅम
23 कॅरेट सोने: ₹1,12,780
22 कॅरेट सोने: ₹1,03,720
18 कॅरेट सोने: ₹84,920
14 कॅरेट सोने: ₹66,612
चांदीचा भाव:1 किलो चांदी: ₹1,34,089
गेल्या 24 तासांत सोन्याचा दर तब्बल 1,100 रुपयांनी घसरला आहे. 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत मागील दोन दिवसांत 1,250 रुपयांची घसरण झाली आहे.किंमतींवर परिणाम करणारे घटक:जागतिक बाजारातील अस्थिरता, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचे संकेत आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधामुळे गुंतवणूकदार सोने-चांदीकडे वळत आहेत. मागणी आणि पुरवठ्यातील असंतुलन यामुळेही दर वाढत होते.सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी ही घसरण दिलासादायक ठरली आहे, ज्यामुळे सोनं आणि चांदी खरेदीसाठी योग्य संधी निर्माण झाली आहे.
read also:https://ajinkyabharat.com/national-service-scheme-din-sajra/