राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या संकटावर भाष्य केले. “संकट मोठ आहे. शेतकऱ्याचं पशूधन, घर, पीक सर्व नष्ट झाले आहे. अश्रू पुसण्याचं काम सरकारने करावं लागेल. मदत करताना हात आखडता घेतला जाणार नाही. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना काहीही अडथळा ठेवणार नाही,” असे शिंदे म्हणाले. शिंदे पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून विरोधी पक्षांनीही मदत केली पाहिजे. फक्त पर्यटन करु नये, प्रत्यक्ष मदत करावी. आम्ही अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना केलेली मदत सर्वांसमोर आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.” सर्व मदत योजनांबाबत एकनाथ शिंदे म्हणाले, “बघा, मुख्यमंत्री स्वतः फिरले, अजितदादा स्वतः फिरत आहेत, मी स्वतः फिरलो. हे मोठं, भयानक संकट आहे. पैशांचा प्रश्न नाही. मदत करताना थोडी काटकसर करावी लागेल, पण हात आखडता घेणार नाही. शेतकऱ्यांचे संसार उद्धवस्त झाले आहेत; त्यांना उभं करणे हे आमचं काम आहे.” शिंदे यांनी महायुतीच्या खासदार-आमदारांनी पूरग्रस्तांना एक महिन्याचं वेतन देण्याच्या निर्णयावर सुरू असलेल्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली. “अरे, त्यांना आरोप कुठे करायचे ते सांगा. मदत करताना आरोप करतात, फोटोंवरून आरोप करतात. धरुन चाला, कार्यकर्त्यांनी फोटो लावला, तुम्ही कधी काही घेऊन गेलात का? तुम्ही होता तेव्हा कार्यकर्ते मोठे फोटो लावत होते, तेव्ह चालत होतं, गोड वाटत होतं. राजकारण करणं दुर्देवी आहे,” असे शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य शेतकऱ्यांसाठी सरकारच्या तत्परतेची स्पष्ट उदाहरण ठरते.
read also:https://ajinkyabharat.com/donald-trumpcha-charges/
