“सत्य बोलायला सुरुवात केलीत, तर राष्ट्र विकासाच्या मार्गावर जाण्यास कोणीही अडथळा आणू शकत नाही. सत्यामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती त्याला हरवू शकत नाही,” असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत व वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले.अकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती व राष्ट्रीय एकात्मता नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. संत नरसिंग महाराज मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला श्रोत्यांची मोठी उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची वैशिष्ट्ये कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार प्रकाश भारसाकळे व राष्ट्रीय मंडळाच्यावतीने पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश गायकी यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकांत तळोकार यांनी केले.कुलश्रेष्ठ यांचा संदेश
कुलश्रेष्ठ म्हणाले, “राष्ट्र विकासासाठी ठोस अजेंडा आवश्यक आहे. धर्माची जोपासना व सत्याचा स्वीकार केलात, तर समाज एकत्र येईल आणि भारत प्रगतीच्या दिशेने पुढे जाईल.”भव्य स्वागत सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात व नागरिकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत झाले. कडक पोलिस बंदोबस्त कार्यक्रमासाठी शहर पोलिस ठाण्यातर्फे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
read also:https://ajinkyabharat.com/navratri-chandika-matechaya-darshanasathi-bhavikanchi-gardi/
