नवरात्रात चंडिका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

नवसाला पावणाऱ्या चंडिका मातेच्या दरबारात भक्तिभावाचा महासागर

“उदे ग अंबे उदे” असा गजर करीत गुरुवारपासून आदिशक्ती मातृशक्ती जगतजननीची आराधना सुरू झाली आहे. नवरात्रोत्सव हा भक्तिभाव आणि मनोकामना पूर्ण करणारा उत्सव मानला जातो. अकोट तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चंडीकापूर येथील चंडिका मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी मंदियाळी दिसू लागली आहे.या निसर्गरम्य ठिकाणी महाराष्ट्रभरातून भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांचे म्हणणे आहे की चंडिका माता ही “हाकेला धावून येणारी, नवसाला पावणारी” देवी आहे. त्यामुळे नवरात्रात देवीच्या ओटी भरायला व पूजनासाठी भक्त मोठ्या संख्येने येतात. अनेक भाविक कुटुंबासह जेवणाचे डबे घेऊन येतात आणि मंदिर प्रांगणात प्रसादाचा आनंद घेतात.जागृत स्वयंभू शिवलिंग देवीच्या मंदिरासमोर महादेवाचे स्वयंभू शिवलिंग आहे. त्यासमोर नंदी असून त्रिशूलालगत तुळसाबाईंचे रुंदावन आहे. येथे नवरात्र पूजनासह क्षेत्र पूर्णिमेला विशेष सोहळा पार पडतो.नवरात्रातील विशेष आयोजन नवरात्रात विविध धार्मिक सोहळ्यांचे आयोजन केले जाते. भाविकांना फळांचे वितरण, महारथी मिरवणुका, तसेच गरबा उत्सवाचे आयोजन होते. सहभागी भाविकांना भेटवस्तू देण्यात येतात.अकोट- अंजनगाव मार्गावरील वाई फाट्यापासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेले चंडिकापूर गाव आज देवीच्या भक्तीने उजळून निघाले आहे. हिरवळ, पिंपळ-कडुलिंबाची सावली आणि भक्तिभावाच्या वातावरणात भाविक मंत्रमुग्ध होत आहेत.

read also:https://ajinkyabharat.com/citizen-ghetla-motha-benefits/