अकोटमध्ये पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे राष्ट्रवादी विचारांचे प्रभावी व्याख्यान;

“राष्ट्र विकासासाठी सत्याची कास धरा” पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

अकोट शहरात राष्ट्रीय वक्ता पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संत नरसिंग महाराज मंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीराष्ट्रीय एकात्मता नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.व्याख्यानात पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी सांगितले की, “सत्य बोलणे सुरू करा, तर राष्ट्र विकासाच्या मार्गावर कोणीही आपल्याला थांबवू शकणार नाही. सत्याची ताकद अशा प्रकारची आहे की, ते कोणत्याही शक्तीसमोर टिकून राहते. राष्ट्र विकासासाठी अजेंडा तयार करा आणि धर्म जपा.”कार्यक्रमात अकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे उपस्थित होते. तसेच, राष्ट्रीय एकात्मता नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे सन्मानचिन्ह व शाल देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी केले, तर संचालन प्रकाश गायकी यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीकांत तळोकार यांनी पार पाडले.व्याख्यानात प्रसिद्ध विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी देव, देश, धर्म, शिक्षण व्यवस्था, आणि भारतातील सनातनी धर्म व त्याचा प्रभाव या विषयावर सखोल मंथन केले. नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शवत हजारो लोक उपस्थिती दर्शवली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नवदुर्गा मंडळाच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली, तर शहर पोलिसांनी तगडा पोलिस बंदोबस्तही तैनात केला होता.सकाळी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी अकोटमध्ये आगमन केले आणि स्थानिक विविध संघटनांशी चर्चा केली. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून ते कार्यक्रम स्थळी रवाना झाले. ढोल-ताशांच्या गजरात आणि नागरिकांच्या टाळ्यांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.

read also : https://ajinkyabharat.com/vaibhav-suryavanshipaksha-agrati-kheli-karunhi-draparcha-defeat/