अकोट: अकोट येथील नरसिंग महाराज प्रांगणात अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या हस्ते वादग्रस्त शेतरस्त्याबाबत १२ शेतकऱ्यांनी आपसी समझोता करून वाद मोक्यावर संपुष्टात आणले. यामध्ये तांदुळवाडी, कालवाडी, खुदावंतपूर, सोनबर्डी, अकोट भाग 1 आणि खेरडा येथील शेतकरी सहभागी झाले.समझोता केलेल्या शेतकऱ्यांना प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास अकोट येथील उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण, नायब तहसीलदार मनोज मानकर, ग्राम महसूल अधिकारी गोपाल वानरे, अकोट मंडळ अधिकारी गणेश भारती, तसेच केमलापुर, मोहाला, तांदुळवाडी, कालवाडी येथील शेतकरी आणि पत्रकार मंडळी उपस्थित होते.महसूल सेवा पंधरवडा अंतर्गत शिवार फेरी आणि रस्ता बाबत मार्गदर्शन अकोट उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी केले, तर आमदार प्रकाश भारसाकळे यांनी महसूल सेवा पंधरवडा अंतर्गत मोलाचे मार्गदर्शन केले.
read also : https://ajinkyabharat.com/kalwaditil-chronic-migrant-niwara-dhokadayak-siti-tatdin-duruschichi-magani/
