कालवाडीतील जीर्ण प्रवासी निवारा धोकादायक; नागरिकांची तातडीने दुरुस्तीची मागणी

जीवघेणा अवस्थेत कालवाडी प्रवासी निवारा

 अकोट: अकोट तालुक्यातील कालवाडी येथील प्रवासी निवाऱ्याची अवस्था गंभीर बनली आहे. या निवाऱ्याचे बांधकाम अत्यंत जीर्ण झाले असून फक्त एक खांब उरला आहे; उर्वरित सर्व खांब पडलेले आहेत.स्थानिक नागरिकांचे मते, पावसाळ्याच्या दिवसांत या निवाऱ्याचा आधार अनेक प्रवाशांना लागतो, मात्र त्याच्या ढासळत्या स्थितीमुळे जीवघातक धोका निर्माण झाला आहे.सार्वजनिक बांधकाम उपविभाग, अकोटकडे नागरिकांनी तातडीने या प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती किंवा नवीन बांधकाम करण्याची मागणी केली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, “तात्काळ जीवघेणा प्रवासी निवारा जमीनदोस्त करावा व सुरक्षित नवीन निवारा उभारावा.”स्थानिक नागरिक आता या समस्येकडे विशेष लक्ष देण्याची जोरदार मागणी करत आहेत.

read also : https://ajinkyabharat.com/talukthi-ingrosy-vibra/