झेडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका: मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर, गुलाल कुणाचा उडणार?
मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला. जानेवारी 2026 अखेरपर्यंत या निवडणुका पार पडणार असल्याने आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादी हाच या निवडणुकीसाठी आधार असेल. 8 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत नागरिकांना हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.या प्रक्रियेत नवीन नावांचा समावेश किंवा वगळणे केले जाणार नाही. मात्र, मतदारांचा प्रभाग चुकीचा लागणे, विधानसभा यादीत नाव असूनही स्थानिक यादीत नाव नसणे अशा त्रुटींवर हरकती घेऊन दुरुस्ती केली जाईल.
जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण
34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण
- ठाणे -सर्वसाधारण (महिला)
- पालघर – अनुसुसूचित जमाती
- रायगड- सर्वसाधारण
- रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
- नाशिक -सर्वसाधारण
- धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- नंदूरबार-अनुसूचित जमाती
- जळगांव – सर्वसाधारण
- अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
- पुणे -सर्वसाधारण
- सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- सांगली – सर्वसाधारण (महिला)
- सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
- छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
- जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- बीड – अनुसूचित जाती (महिला)
- हिंगोली -अनुसूचित जाती
- नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- लातूर – सर्वसाधारण (महिला)
- अमरावती – सर्वसाधारण (महिला)
- अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
- परभणी – अनुसूचित जाती
- वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
- बुलढाणा -सर्वसाधारण
- यवतमाळ सर्वसाधारण
- नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- वर्धा- अनुसूचित जाती
- भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
- गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
- चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
- गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)
गुलाल कुणाचा?
Related News
निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता सर्वच पक्षांच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या निश्चित झाल्याने उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया वेग घेणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या ग्रामीण भागातील सत्तेच्या महत्त्वाच्या गड्या असल्याने सत्ता कोणाच्या गळ्यात पडते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/janoon-ghaya-aas-avnish-sharan-yancha-inspiring-migration/

