मनसेच्या निवेदनात तात्काळ मदतीची मागणी

निवेदनात

संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचे, जनावरांचे आणि मानवी जीविताचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना पंचनाम्यांच्या फेऱ्यात न अडकवता तात्काळ भरीव मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केली आहे. या मागणीसंदर्भात बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, राज्यातील ५० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, भुईमूग, मका, ज्वारी, भाजीपाला व फळपिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो गुरेढोरे दगावली आहेत. अनेक शेतजमिनी पुरामुळे पूर्णपणे खरडून गेल्या आहेत.

मनसेने सरकारकडे केलेल्या मागण्या:

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करावी.जिरायत पिकांसाठी प्रति हेक्टर १ लाख रुपये, बागायत पिकांसाठी १.५ लाख रुपये, फळपिकांसाठी प्रति हेक्टर २ लाख रुपये मदत द्यावी.मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत व एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी.म्हैस, बैल, गाय, घोडा या मृत जनावरांसाठी ७५,००० रुपयांची मदत द्यावी.जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर १ लाख रुपये मदत द्यावी.घर पडलेल्या नागरिकांना घरकुल योजनेतून पक्की घरे उपलब्ध करून द्यावीत.या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे, नांदुरा तालुकाध्यक्ष भागवत उगले, मोताळा तालुकाध्यक्ष अमोल गोरे, तालुका सचिव प्रवीण देशमुख, चिखली शहराध्यक्ष नारायण देशमुख, उपतालुकाध्यक्ष संजय दळवी, संदीप नरवाडे, अविनाश सुरडकर, आशिष गायके, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अंकित इंगळे, गणेश जाधव, अर्जुन पाटील, ऋषिकेश पाटील, सागर इंगळे, अंकुश बरंडवाल, शुभम जाधव, नितीन गायकवाड, धीरज सुरडकर, वैभव जाधव, सागर खरे, तुषार दांडगे, सूरज गोफणे, समाधान राऊत, वैभव उबाळे, मोहन भोरे यांच्यासह असंख्य मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.