आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात कमी वयात भारतासाठी शतक ठोकणारा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार सुरुवात केली आहे. अंडर-19 टीम इंडियाकडून पहिल्याच सामन्यात वैभवने केवळ 22 चेंडूत 38 धावांची तडाखेबाज खेळी करून कांगारू गोलंदाजांची धुलाई केली. त्याच्या या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता.
कर्णधार आयुष म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघामधील मालिकेला 21 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेत 3 एकदिवसीय आणि 4 दिवसांचे 2 कसोटी स्वरूपाचे सामने खेळवले जाणार आहेत.
पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत 9 गडी बाद करत 225 धावांवर रोखलं. त्यानंतर भारताची सलामी जोडी वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेने झंझावाती सुरुवात केली. अवघ्या 4.5 षटकांतच 50 धावांची भागीदारी जमवली. आयुषने हुशारीने वैभवला स्ट्राईक देत फटकेबाजीला संधी दिली.
मात्र पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाने एकाच ओव्हरमध्ये दोन झटके देत भारताची गाडी थांबवली. वैभव 22 चेंडूत 38 धावा करून बाद झाला, तर त्यानंतर लगेचच आयुष म्हात्रेही (10 बॉल, 6 धावा) बाद झाला. त्यामुळे भारताचा स्कोअर 50-0 वरून काही क्षणातच 50-2 असा झाला.
आता भारताच्या इतर फलंदाजांसमोर उर्वरित 176 धावांचं आव्हान किती सहजतेने पेलतात, याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
read also :https://ajinkyabharat.com/gopichand-padakranya-vasavyacha-prohibition/
