पळसोद गावचे माजी सरपंच

लोककलेच्या माध्यमातून समाजजागृती करणारे नागोराव खराटे यांचे निधन

पळसोद (ता. अकोला) : पळसोद गावचे माजी सरपंच, लोककलेचे जिवंत उदाहरण आणि मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून ओळखले जाणारे नागोराव पुंडलीक खराटे  यांचे 21 सप्टेंबर 2025 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.

नागोरावजी खराटे हे केवळ सरपंच म्हणूनच नव्हे तर एक हुनरबाज कलाकार म्हणूनही समाजामध्ये लोकप्रिय होते. कलापथक, दंडार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, अनिष्ट प्रथा निर्मूलन यांसारख्या विषयांवर प्रभावी संदेश दिले.

त्यांचा मराठभोळा पेहराव, नेहमी हसतमुख राहण्याची सवय आणि लोकांना संकटात मदतीसाठी तत्पर धावून जाणारा स्वभाव हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जात असे. परिस्थिती कितीही नाजूक असली तरी मनाची श्रीमंती आणि माणुसकी यामुळे ते सर्वांच्या मनात घर करून गेले होते.

गावकऱ्यांच्या मते, “नागोरावजींच्या रूपाने गावाने एक लोककलावंत, समाजहितचिंतक आणि खरं लोकनेतृत्व गमावलं आहे.”

शोकाकुल परिवार :
प्रकाश नागोराव खराटे, सुभाष नागोराव खराटे, कैलास नागोराव खराटे, विलास नागोराव खराटे तसेच संपूर्ण वाशी पळसोद ग्रामस्थ.

read also :https://ajinkyabharat.com/chief-minister-deputy-chief-minister/