नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही : केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

नुकसानग्रस्त

 

किनगांव राजा : नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसण्याची ग्वाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांना दिली आहे. सिंदखेड राजा परिसरामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे किनगांव राजा मंडळ अंतर्गत येणाऱ्या सावखेड तेजन,पळसखेड चक्का व किनगांव राजा यासह तालुक्यातील इतर भागातील १५ हजार २३३ हेक्टर शेत जमिनीवरील सोयाबीन,कापूस,तूर व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते,या यासंदर्भाची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांना मिळाली होती त्याच दिवशी त्यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या,दिल्ली येथील कामकाज आटोपुन ते मतदारसंघात आले असता त्यांनी ता.२० सप्टेंबर रोजी सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला त्यांना आधार देत ढगफुटी सदृश्य पाऊस हे नैसर्गिक संकट आहे.या नैसर्गिक संकटाला हिंमतीने सामोरे जावे असे आवाहन केले झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून ते सरकारकडे पाठवण्याचे निर्देश केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला दिलेत केंद्र आणि राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली,यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार शशिकांत खेडेकर,उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, तालुका कृषी अधिकारी भागवत किंगर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख वैभव देशमुख,माजी सभापती बाबुराव मोरे,शिवप्रसाद ठाकरे,युवा सेना तालुका प्रमुख अमोल काकड, माजी युवा सेना तालुका प्रमुख गणेश काकड,सुनील जाधव, यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पूरग्रस्तांच्या आरोग्य सेवेसाठी सेवक रथ’ मोबाइल वैद्यकीय सेवा :
दरवर्षी पावसाळ्यात नदी नाल्यांना पूर येऊन नदीकाटची गावे बाधित होतात.या पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी केंद्र सरकारच्यावतीने ‘सेवक रथ’ मोबाइल वैद्यकीय सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. हे युनिट पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांवर उपचार सेवा देणार आहेत त्यामुळे अपातग्रस्त भागात तात्काळ वैद्यकीय उपचार रोग प्रतिबंधक उपचार नागरिकांना या सेवेच्या माध्यमातून मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.

Related News

read also : https://ajinkyabharat.com/smriti-mandhanacha-jalad-century-vikram/

Related News