स्मृती मंधानाचा जलद शतक विक्रम

विराट-सेहवागलाही मागे टाकलं

न्यू दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3rd ODI मध्ये भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची झोड उठवून वेगवान शतकी खेळी केली. तिच्या या विक्रमी शतकाची चर्चा संपूर्ण क्रीडाविश्वात रंगली आहे.निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने 412 धावांचं लक्ष्य ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना स्मृती मंधानाने फक्त 50 चेंडूत शतकी खेळी करत भारताच्या विजयाची आशा जिवंत ठेवली. तिच्या हिटमध्ये दोन षटकार आणि नऊ चौकारांचा समावेश होता.स्मृती मंधानाने ही मालिकेतील सलग दुसरी शतकी खेळी केली असून, वनडे क्रिकेटमधील वैयक्तिक 13वे शतक ठोकलं आहे. यामुळे तिने सुझी बेट्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे आणि पुढे फक्त मेग लेनिंगची आव्हाने उरली आहेत.महिलांच्या क्रिकेटमध्ये हे दुसरे सर्वात जलद शतक ठरलं आहे. स्मृतीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 चेंडूत शतक पूर्ण केलं, तर विराट कोहली 52 चेंडूत आणि वीरेंद्र सेहवाग 60 चेंडूत शतक पूर्ण करत होते. तसेच, स्मृतीने फक्त 23 चेंडूत अर्धशतक झळकावले, जे भारतीय महिलांच्या एकदिवसीय सामन्यातील सर्वात जलद अर्धशतक ठरलं.स्मृती मंधानाच्या या प्रदर्शनामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आगामी वनडे वर्ल्डकपमध्ये ही स्टार फलंदाज आणखी विक्रम गाठण्याची तयारी करत आहे.

read also : https://ajinkyabharat.com/sachin-tendulakarasabat-affarechaya-afwan-revealed/