भारतीय आयटी प्रोफेशनल्सच्या स्वप्नांचा प्रवास अवघड

अमेरिकेत H-1B व्हीसा शुल्क वाढले

न्यूयॉर्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी H-1B व्हीसाची वार्षिक फी एक लाख डॉलर्सपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. ही नवीन व्यवस्था 21 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे फक्त कंपन्यांनाच नव्हे, तर हजारो भारतीय आयटी प्रोफेशनल्स आणि इंजिनिअर्सच्या स्वप्नांवर थेट परिणाम होऊ शकतो.सध्या H-1B व्हीसा धारकांचे सरासरी वार्षिक उत्पन्न सुमारे 1,67,000 डॉलर आहे, तर नव्याने नोकरीला सुरुवात करणार्‍यांचे वेतन 60,000 ते 1,00,000 डॉलर दरम्यान आहे. याचा अर्थ नवीन फी अनेक कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण वार्षिक कमाईच्या बरोबरीची किंवा त्याहून जास्त आहे. आतापर्यंत H-1B व्हीसासाठी फक्त 215 डॉलर अर्ज शुल्क आणि 780 डॉलर स्पॉन्सरशिप शुल्क घेतले जात होते.विशेषतज्ज्ञांचे मत आहे की एवढ्या मोठ्या व्हीसा शुल्कामुळे कंपन्या व्हीसा स्पॉन्सर करण्यापासून मागे हटू शकतात. मायक्रोसॉफ्ट आणि Amazon सारख्या टेक कंपन्यांनी त्यांच्या H-1B आणि H-4 कर्मचाऱ्यांना अमेरिकेत राहण्याचा सल्ला दिला आहे.भारतीय आयटी सेक्टरसाठी ही खबरदारी चिंता वाढवणारी ठरू शकते, कारण दरवर्षी हजारो तरुण H-1B व्हीसाद्वारे अमेरिकेत नोकरी करण्यासाठी जातात. ट्रम्प प्रशासनाच्या या नव्या धोरणामुळे त्यांचे स्वप्न महागडे आणि कठीण झाले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/panchayat-expansion-more-guidance/