ऑगस्ट २०२५ मध्ये मारुती बलेनो सर्वाधिक विक्री होणारी प्रीमीयम हॅचबॅक कार ठरली आहे. भारतीय बाजारात तिची एक्स-शोरुम किंमत ६.७४ लाख ते ९.९६ लाख रुपये आहे. ऑगस्ट महिन्यात बलेनोची १२,५०० हून अधिक युनिट्स विकल्या गेल्या, ज्यामुळे ती सर्वाधिक विक्रीची कार बनली.
दुसऱ्या क्रमांकावर टोयोटा ग्लॅझा असून, तिच्या विक्रीत ५,१०० हून अधिक युनिट्स विकल्या गेल्या. तिसऱ्या क्रमांकावर टाटा अल्ट्रोझ असून, तिच्या मासिक विक्रीत १% वाढ नोंदवली गेली. चौथ्या क्रमांकावर हुंडई i20 असून, तिची मासिक विक्री ७% वाढली, मात्र वार्षिक विक्रीत २६% घट दिसली.
मारुती बलेनोमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, ABS सह EBD, ISOFIX चाईल्ड सीट माऊंट, हाय-स्पीड वार्निंग अलर्ट, रिव्हर्स पार्किंग सेंसर सारखी फिचर्स उपलब्ध आहेत. टोयोटा ग्लॅझा मध्ये टच स्क्रीन इंफोटेनमेंट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ६ एअरबॅग मिळतात. अल्ट्रोझमध्ये ३६० डिग्री कॅमेरा, अपडेटेड डॅशबोर्ड, व्हॉईस-आसिस्टेड सनरूफ आहेत. i20 मध्ये एलईडी हँडलाईट्स, टचस्क्रीन इंफोटेनमेंट आणि एलईडी टेललाईट्स उपलब्ध आहेत.
या विक्री आकड्यांवरून दिसते की, मारुती बलेनोचा जलवा कायम असून ती पुन्हा ऑगस्ट २०२५ ची बेस्टसेलर कार ठरली आहे.
read also :https://ajinkyabharat.com/ma-district-magistrate-yana-diles-request/
