अकोट :छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्यात शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्याबरोबरच वहिवाटीचे रस्ते नकाशावर समाविष्ट करण्याची प्रक्रिया तालुक्यात सुरू झाली आहे. १८ सप्टेंबरपासून कासोद–शिवपूर गावातून या मोहिमेचा प्रारंभ झाला.
या अंतर्गत पुनर्वसन गट क्रमांक ३३३ ते तलाव हा रस्ता प्रत्यक्षात मोजण्यात आला. नायब तहसीलदार सुभाष सावंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोजणी झाली. यावेळी अत्याधुनिक बेस मशीन आणि रोव्हर मशीन वापरल्यामुळे सीमांकन प्रक्रिया अचूक आणि जलद पूर्ण झाली.
यापूर्वी अनेक शेतरस्ते अरुंद झाल्याने जड वाहतूक अशक्य झाली होती. या मोहिमेमुळे अडथळे दूर होऊन मालवाहतूक सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या कार्यात ग्राम महसूल अधिकारी राजाभाऊ खामकर, भुकरमापक आर. डी. राऊत, एस. व्ही. पागृत यांनी सहभाग घेतला. तसेच शिव–पाणंद शेतरस्ता चळवळीचे सतीश बोंद्रे यांच्यासह गजानन बोंद्रे, मुरलीधर बोंद्रे, रामभाऊ सहारे, नागेश भगत, अमर महाले, सोपान महल्ले, निखिल महल्ले, सुधीर बोंद्रे, सुधाकर बोंद्रे, संदीप महाले, राजू सहारे, रामराव नाईक, श्याम सहारे, सूरज सुरत्ने, बयराम तायडे, लक्ष्मण अढाऊ, गोवर्धन भगत आदी शेतकरी उपस्थित होते.
अकोलखेड मंडळातील शेतरस्त्यांच्या कामासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
नायब तहसीलदार सुभाष सावंग प्रत्यक्ष पाहणी करत आहेत.
मंडळ अधिकारी पी. ए. होपळ रस्त्यांची पाहणी करीत आहेत.
ग्राम महसूल अधिकारी राजाभाऊ खामकर जनजागृती करत आहेत.
ग्रामपंचायत अधिकारी अनंत मोहोकार यांचेही सहकार्य मिळत आहे.
देऊळगाव, कुटासा, अडगाव, नेव्हरी, वडगाव मेंढे, चंडिकापूर, जळगाव नहाटे, राजूरवाडी आणि टाकळी या गावांत लवकरच सीमांकन प्रक्रिया राबवली जाणार आहे.
“शिव–पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रशासनास संपूर्ण सहकार्य आहे. शेतकऱ्यांचा उत्साह आणि प्रशासनाची कार्यपद्धती यांचा संगम झाल्याने जिल्ह्यात शेतरस्त्यांची कामे अधिक वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह ठरत आहेत.”
– सतीश बोंद्रे, कृती समिती सदस्य, शिव–पाणंद शेतरस्ता चळवळ
read also :https://ajinkyabharat.com/social-media/
