चंचल पितांबरवाले यांचे आवाहन

भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन

अकोट : शहरातील सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असलेल्या भूमी फाउंडेशनच्या वतीने यावर्षीही भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता सरस्वती विद्यालय, कॉलेज रोड, अकोट येथे पार पडणार आहे.

या महोत्सवात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्याला सोन्याचे नाणे, तर इतर विजेत्यांना चांदीची फ्रेम पुरस्कार स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे.

अकोट शहराला समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभलेला असून, येथून अनेक कलाकारांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मुला-मुलींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी भूमी फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

आजवर विविध समाजोपयोगी उपक्रमांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या भूमी फाउंडेशनच्या अध्यक्षा चंचल पितांबरवाले यांनी सांगितले की, “पालकांनी आपल्या मुलांना या महोत्सवात सहभागी करून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव द्यावा. तसेच ग्रामीण भागातील तरुण-तरुणींनीही उत्साहाने सहभागी व्हावे.”

read also :https://ajinkyabharat.com/administrative-pratidhachaya-administrator-asha-raut-poisanchaya-tabhyat/