मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांची नाराजी

OTP न मिळाल्याने हजेरीत अडथळे… जबाबदार कोण?

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांची नाराजी

मानधन न मिळाल्याने संताप; OTP अडचणींमुळे हजेरीवरही संकट

अकोला :मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत तेल्हारा पंचायत समिती परिसरातील प्रशिक्षणार्थी मानधन वेळेवर न मिळाल्याने नाराज झाले असून त्यांनी जिल्हा परिषद अकोलाचे मुख्य कार्यपालन अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.प्रशिक्षणार्थ्यांनी निवेदनात नमूद केले की, शैक्षणिक वर्ष 2024-25 व 2025-26 या कालावधीत त्यांची जिल्हा परिषद शाळांमध्ये नियुक्ती झाली असून त्यांनी नियमित सेवा बजावली आहे. मात्र जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांचे मानधन अद्याप देण्यात आलेले नाही.मानधनाबाबत विचारणा केल्यावर कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार प्रशिक्षणार्थ्यांनी केली. उलट, तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असून हजेरी वेळेवर भरली जात नसल्याचा ठपका ठेवला जातो. पंचायत समिती स्तरावर अधिकाऱ्यांची भेट घ्या असे सांगितले जाते, तर पंचायत समिती तेल्हाराचे अधिकारी कलेक्टर ऑफिसकडे धाडतात.प्रशिक्षणार्थ्यांनी सांगितले की, हजेरी पोर्टलवर भरण्यासाठी आवश्यक असणारा OTP वेळेवर उपशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मिळत नाही. त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होतात व हजेरीत विलंब होतो. याची जबाबदारी मात्र प्रशिक्षणार्थ्यांवर ढकलली जाते.प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, थकीत मानधन तात्काळ अदा करावे व OTP संबंधी अडचणी दूर कराव्यात. अन्यथा प्रशिक्षणार्थ्यांच्या मनोबलावर परिणाम होऊन योजना अडखळण्याचा धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

read also : https://ajinkyabharat.com/yawatma-north-indian-front-district-executive-nivad/

Related News

Related News