आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया सध्या मजबूत स्थितीत आहे. मात्र, ओमानविरुद्धच्या सामन्याआधी प्लेइंग 11 मध्ये मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत. काही स्टार खेळाडूंना विश्रांती देण्यात येऊ शकते, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
अ’ गटातील अखेरच्या सामन्यापूर्वी भारताने पर्यायी सराव सत्र आयोजित केले होते. यात केवळ 9 खेळाडूंनी सहभाग घेतला. मात्र जसप्रीत बुमराह, शिवम दुबे, संजू सॅमसन, शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांसारखे खेळाडू यात सहभागी झाले नाहीत. विशेष म्हणजे शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा हे सराव सत्रात नेहमी सक्रिय असतात, पण यावेळी ते गायब होते.
या सराव सत्रात युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने गोलंदाजीसोबत फलंदाजीतही चमक दाखवली. त्याच्या कामगिरीवरून त्याला ओमानविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. राणाला याआधी एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते, अशा चर्चेला उधाण आले आहे. त्याच्या जागी अर्शदीप सिंह मैदानात उतरू शकतो. सराव सत्रात अर्शदीपसह रिंकू सिंह आणि जितेश शर्मा यांनी घाम गाळला.
21 सप्टेंबर रोजी दुबईतील आंतरराष्ट्रीय मैदानावर भारत-पाक आमनेसामने येणार आहेत. रविवारी रात्री 8 वाजता होणाऱ्या या हायव्होल्टेज सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याआधीच भारताने आबुधाबीमध्ये पाकिस्तानला 7 गडी राखून हरवले होते. त्यामुळे पुढील सामना रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
read also :https://ajinkyabharat.com/jagatil-pahila-helicopter-daroda/
