मुंबई :ॲपलचा नवीन iPhone 17 बाजारात दाखल होताच चाहत्यांचा उत्साह प्रचंड वाढला आहे. मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील ॲपल स्टोअरबाहेर आज सकाळपासूनच प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी तर मध्यरात्रीच स्टोअरबाहेर मुक्काम ठोकत आपल्या नंबरची खात्री केली.
स्टोअर उघडण्याआधीच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तहानभूक विसरून अनेक आयफोनप्रेमी तासन्तास उभे राहून आयफोन 17 खरेदीसाठी उत्सुक होते. काहींनी पहाटे स्टोअर उघडताच आयफोन खरेदीचा आनंद घेत सोशल मीडियावर सेल्फी पोस्ट करत तो क्षण खास बनवला.
मुंबईपुरतं मर्यादित न राहता, दिल्लीच्या साकेत येथील ॲपल स्टोअरबाहेर देखील अशीच गर्दी पाहायला मिळाली. देशभरातील आयफोनप्रेमींची ही धावपळ पाहता, ॲपलची लोकप्रियता अजूनही किती प्रचंड आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
iPhone 17 सीरिजच्या लाँचनंतर भारतीय बाजारपेठेत आयफोनची मागणी प्रचंड वाढली असून, यंदाही ॲपलने आपला क्रेझ कायम ठेवला आहे.
read also :https://ajinkyabharat.com/shabana-azhmaninya-75-vyaddivasachi-rangat/