दुनिथ वेलालागेला मोठा धक्का

Asia Cup मधील धक्कादायक घटना :

आशिया कप 2025 दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. श्रीलंकेचा युवा क्रिकेटपटू दुनिथ वेलालागे याच्या वडिलांचं अचानक निधन झालं. ही घटना 18 सप्टेंबर रोजी अबूधाबीमध्ये झालेल्या श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यादरम्यान घडली. सामना संपल्यानंतरच दुनिथला या दु:खद घटनेची माहिती देण्यात आली.

श्रीलंकेने हा सामना जिंकत सुपर फोरमध्ये प्रवेश मिळवला, पण दुनिथसाठी हा विजय शोकांतिका घेऊन आला. त्याचे वडील सुरंगा वेलालागे यांना हृदयविकाराचा झटका आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

दुनिथच्या ओव्हरमध्ये लागले 5 सिक्स

या सामन्यात शेवटची ओव्हर दुनिथ वेलालागेने टाकली होती. अफगाणिस्तानचा दिग्गज ऑलराऊंडर मोहम्मद नबीने या षटकात सलग पाच षटकारांसह तब्बल 32 धावा काढल्या. काही माध्यमांनी या घटनेला वडिलांच्या निधनाशी जोडत बातमी दिली आहे. मात्र श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

शोकसागरात बुडाला वेलालागे

सामना संपल्यानंतर श्रीलंकेचे कोच सनथ जयसूर्या आणि टीम मॅनेजर यांनी दुनिथला ही माहिती दिली. त्यानंतर तो तत्काळ मायदेशी रवाना झाला. आता तो आशिया कपच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.

श्रीलंकेला आता सुपर फोरमध्ये भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध खेळायचं आहे. दुनिथची अनुपस्थिति संघासाठी मोठं आव्हान ठरू शकते.

read also :https://ajinkyabharat.com/rich-panchayat-raj-abhiyan-concluded/