इराणमधील चाबहार पोर्ट हे भारतासाठी रणनीतीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. पाकिस्तानला टाळून अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी थेट व्यापार करण्यासाठी हा बंदर भारताचा “खुष्कीचा मार्ग” मानला जातो. मात्र, अमेरिकेने दिलेली विशेष सूट आता रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने भारताच्या धोरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अमेरिकेने २९ सप्टेंबर २०२५ पासून चाबहार पोर्टच्या संचालन, फायनान्सिंग किंवा सर्व्हींगमध्ये सहभागी कोणत्याही भारतीय वा विदेशी संस्थांवर प्रतिबंध लागू होऊ शकतो, कारण आता या पोर्टवर इराणवर असलेल्या सर्व प्रतिबंधांचा पूर्ण परिणाम होईल. भारताने या पोर्टच्या विकासासाठी सुमारे ३,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पोर्टच्या विकासात Ports Global Limited (IPGL) आणि Afcons Infra यांचा मोठा वाटा आहे. IPGL येथे शाहिद बेहेश्ती टर्मिनलचे संचालन करते आणि त्याचे आधुनिकीकरण केले आहे.चाबहार पोर्ट भारतासाठी केवळ आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर रणनीतीदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. पाकिस्तानच्या ग्वादर पोर्टमध्ये चीनच्या वाढत्या उपस्थितीस संतुलन साधण्यासाठी आणि अफगाणिस्तान तसेच मध्य आशियाशी थेट कनेक्टीव्हीटी सुनिश्चित करण्यासाठी हा पोर्ट महत्त्वाचा ठरतो. International North-South Transport Corridor च्या माध्यमातून भारत हा मार्ग पुढे नेत आहे, ज्यामुळे स्थानिक व जागतिक व्यापारात भारताला धोरणात्मक लाभ मिळतो.अमेरिकेच्या निर्णयामुळे भारताला वित्तीय, कायदेशीर आणि रणनीती आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पोर्टच्या विकासात गुंतवलेल्या निधीचे संरक्षण, संचालनाची कायदेशीर स्थिती आणि भविष्यातील कनेक्टीव्हीटी या सर्व बाबींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले आहे की चाबहार पोर्ट पाकिस्तान bypass करून अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी कनेक्टीव्हीटी वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावतो.अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने या निर्णयाचे कारण स्पष्ट करताना म्हटले आहे की, इराणच्या काही क्रियाकलापांचा वापर अवैध फंडींगसाठी होतो, जे अमेरिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ल्यासाठी वापरला जाऊ शकतो. २०१८ मध्ये दिलेली विशेष सुट अफगाणिस्तानमध्ये स्थिर सरकारच्या काळात पोर्टला मान्य केली गेली होती. मात्र २०२१ मध्ये तालिबानच्या सत्ता येण्यानंतर आणि भारताद्वारे पोर्टचा विस्तार व International North-South Transport Corridor ला जोडल्यामुळे, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.भारतासाठी आता आव्हान म्हणजे या निर्णयाचा व्यावसायिक आणि धोरणात्मक परिणाम कमी करणे. भारताला या पोर्टच्या माध्यमातून मध्य आशियाशी थेट व्यापार चालू ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी भारताला अमेरिकेसोबत चर्चा करून कोणत्या प्रकारे नियमांचे पालन करावे, तसेच इराणसह कनेक्टीव्हीटी योजना सुरक्षित कशी करावी यावर काम करावे लागेल.शेवटी, चाबहार पोर्ट भारताच्या व्यापार आणि धोरणात्मक हितासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अमेरिकेच्या नवीन निर्णयामुळे भारतासाठी नियोजन आणि रणनीतीच्या दृष्टीने गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. मात्र, या संकटातून मार्ग काढणे आणि पोर्टच्या कनेक्टीव्हीटीसह आर्थिक व भू-राजनीतिक धोरण सुरक्षित ठेवणे भारतासाठी प्राथमिकता ठरले पाहिजे.
read also : https://ajinkyabharat.com/one-day-aani-t20-madhe-asiatil-sanghmancha-thrill-young-khedunsathi-suvarnasandhi/
