छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

आंतरवाली दगडफेकी प्रकरण

आंतरवाली दगडफेकी प्रकरण: छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट, शरद पवारवर गंभीर आरोप

आंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक झाल्याच्या प्रकरणावर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.भुजबळ म्हणाले, आदल्या रात्रीच हा प्लान ठरवण्यात आला होता आणि त्या बैठकीत पवार साहेबांचा एक आमदार सहभागी होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती माहीत असतानाही शरद पवार त्या ठिकाणी गेले, असा दावा त्यांनी केला. यावेळी 83 पोलिसांवर दगडफेक झाली होती.भुजबळांनी काही ओबीसी प्रमाणपत्रं देखील दाखवली, ज्यापैकी काही खोटी असल्याचा दावा त्यांनी केला. काही प्रमाणपत्रांवर खाडाखोड असल्याचे, तर काहीवर ‘मराठी कुणबी’ असे चुकीचे नमूद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी खोटी प्रमाणपत्र तपासण्यासाठी समिती नेमावी, अशी मागणी केली आहे.भुजबळ म्हणाले, शिंदे समितीचे काम आता काय आहे? शपथपत्रावरून निर्णय घेणे मान्य नाही. एका ताटात दोन जण जेवतात, त्यात मध्ये तीन-चार घुसले तर काय होईल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.ते पुढे म्हणाले, निवडणूक आली की जरांगे-पाटील उभे राहतात, त्यांना धडा शिकवणे आवश्यक आहे. ओबीसी, एससी, एसटी, सर्व जाती एकत्र आल्या तर काहीही अशक्य नाही. तेली, माळी, धनगर बघू नका; सर्वजण ओबीसी म्हणून एकत्र या, असे आवाहन त्यांनी केले.

read also : https://ajinkyabharat.com/cricket-bat-aani-lokhandi-rodne-youth-jabhala-mahan/