दक्षिण आशियात नवे समीकरण!

पाकिस्तान-सौदी अरेबिया करार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण असतानाच पाकिस्तानने सौदी अरेबियासोबत महत्त्वपूर्ण करार केला आहे. या करारावर सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.या करारानुसार बाह्य हल्ल्याच्या प्रसंगी दोन्ही देश एकमेकांना साथ देणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानची शक्ती वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

भारत व पाकिस्तानचा लष्करी खर्च

लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत मात्र भारत पाकिस्तानपेक्षा खूप पुढे आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूशनच्या आकडेवारीनुसार, 2024-25 साली भारताने संरक्षणावर 86.1 अब्ज डॉलर्स खर्च केले. हा खर्च गेल्या वर्षाच्या तुलनेत 1.6 टक्क्यांनी वाढलेला आहे.याउलट पाकिस्तानचा लष्करी खर्च केवळ 10.2 अब्ज डॉलर्स इतकाच आहे.

भारताची प्रतिक्रिया

या करारावर भारताने सावध भूमिका घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, “या करारामुळे राष्ट्रीय सुरक्षा व प्रादेशिक स्थैर्यावर काय परिणाम होतो, याचे बारकाईने परीक्षण करण्यात येईल. भारताचे प्राधान्य हे स्वतःचे संरक्षण मजबूत करणे व देशहिताचे रक्षण करणे हेच राहील.”

दक्षिण आशियावर परिणाम

या कराराचा परिणाम केवळ भारतावरच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियाई प्रदेशावर होणार असल्याचे मानले जात आहे. या नव्या घडामोडीनंतर भारत कोणते पाऊल उचलतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.हा करार पाकिस्तानसाठी मोठी कूटनीतिक जिंक मानली जात असली तरी, लष्करी बळ व धोरणात्मक क्षमतेत भारत अद्याप पुढे असल्याचे तज्ज्ञ अधोरेखित करतात.

read also :  https://ajinkyabharat.com/amit-shah-yanchaya-sitting-honar-decision/