फुलचंद भगत
मंगरुळपीर:-मंगरुळपीर तालुक्यासह संपुर्ण जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातले ,हातातोंडाशी आलेला शेतकर्यांचा घास हिरावल्या गेल्यामुळे संपीर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ घोषीत करुन शेतकर्यांचे सर्व प्रकारचे संपुर्ण कर्जमाफ करावे यासाठी शेकडो शेतकरी बांधवांचा माजी राज्यमंञी सुभाषराव ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढुन आपल्या मागण्याचे लेखी निवेदन मंगरुळपीर तहसिलदार यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांना दिले आहे.वाशिम जिल्हयामध्ये मागील जुन महीन्यापासुन अतिवृष्टी स्वरुपाची ढगफुटी सारखा पाऊस पडत असुन,जिल्हयामध्ये पावसाची सरासरी पावसाने ओलांडली आहे. सप्टेंबर महीन्यापर्यंत संपुर्ण वाशिम जिल्हयात ८३८ मी मी पाऊस पडलेला आहे. असे इंडीयन मेट्रोलॉजीकल डिपारमेंट पुणे यांनी दि. १७ सप्टेंबर २०२५ पर्यंत जाहीर केले, असुन संपुर्ण पावसाळयात पावसाची सरासरी ही ७२५ मीमीच आहे. आज रोजी सरासरी पेक्षा ११३ मी मी पाऊस जास्त झालेला आहे. त्यामुळे नदयांना पुर सदृष्य परीस्थीती उद्भवलेली आहे. झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे संपुर्ण नुकसान झाले असुन, सर्व शेती तुडुंब पावसाने भरली आहे.सदर पुर परीस्थीतीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असुन,शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. त्यानुसार जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांना तात्काळ एकरी आर्थिक मदत देणे संदर्भात कार्यवाही करुन, वाशिम जिल्हा हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज माफ करण्यात यावे या मागणीसाठी मंगरुळपीर तहसिलवर शेकडो शेतकर्यांनी माजी राज्यमंञी सुभाषराव ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढत आपल्या मागण्याचे लेखी निवेदन प्रशासनाला सादर केले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/contract-2/
