ठेकेदाराच्या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांचा संताप

ठेकेदाराच्या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांचा संताप

हिरपूर :आज सकाळी जयाजी महाराज विद्यालयाजवळ ट्युशनला जात असताना दोन विद्यार्थ्यांना अपघाताचा सामना करावा लागला. सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांचे ठाम मत आहे की या अपघातासाठी मूर्तिजापूर–आसरा मार्गावरील रस्त्याचे संथ व निकृष्ट दर्जाचे काम थेट जबाबदार आहे.गेल्या तीन–चार महिन्यांपासून या मार्गावर माती मिश्रित मुरूम टाकण्यात आला असून त्याचा दर्जा इतका खालावलेला आहे की साधी वाहनेदेखील वारंवार फसत आहेत. एका बाजूला काम सुरू असताना दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी गिट्टी व मुरूमाचा नीटसा भराव न टाकल्याने घसरण होऊन वारंवार अपघात होत आहेत.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, या मार्गाचे काम पाहणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजी व बेफिकीर वृत्तीमुळे शेकडो लहानमोठे अपघात झाले असून आजवर कोणतीही जबाबदारी निश्चित केलेली नाही

read also : https://ajinkyabharat.com/mouje-dhaga-shivaat-wildlife-dhumaku-shetakyanchi-pick-quoted/