हिरपूर, ता. मुर्तीजापूर (दि. १७): माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून हिरपूर ग्रामपंचायत कार्यालयात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ उत्साहात सुरू करण्यात आले.
या निमित्ताने आयोजित ग्रामसभेला सरपंच श्री. अमोल गडवे, ग्रामविकास अधिकारी सौ. अमिता दीपक इंगळे, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रशांत बोळे, शिक्षक अकील सर, अश्फाक सर, पत्रकार दिलीप तिहीले, ग्रामपंचायत लिपिक नितीन वसु, देवानंद खंडारे, आंबेडकर सर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसभेत शेतीसंबंधी पानंद रस्ते, गावातील स्वच्छता उपक्रम तसेच अभिनव “एक पेड़ – माँ के नाम” या उपक्रमावर सविस्तर चर्चा झाली. ग्रामस्थांनी एकमुखाने संकल्प केला की गावाला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले जातील.
ग्रामस्थांनी गाव व परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करत, लोकसहभागाचे सामर्थ्य दाखवून सर्वांनी “सशक्त पंचायत – समृद्ध महाराष्ट्र” या घोषणेचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
read also :https://ajinkyabharat.com/priyadarshini-indalkchi-vinanti/