‘निशांची’ चित्रपट 19 सप्टेंबरपासून थिएटरमध्ये

ऐश्वर्य ठाकरेचा बॉलिवूड पदार्पण

बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरे आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘निशांची’ हा चित्रपट येत्या 19 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाची थेट स्पर्धा ‘जॉली एलएलबी 3’शी होणार आहे.

चित्रपटाची कथा 1986 ते 2016 या काळातील आहे आणि यात दोन भावांची दुहेरी भूमिका ऐश्वर्यने साकारली आहे. अनुराग कश्यप म्हणतो, “हा चित्रपट भावनिकदृष्ट्या खूप तगडा आहे. एक आई आणि तिच्या दोन्ही मुलांच्या कौटुंबिक नात्यांची कथा यात पहायला मिळणार आहे.”

चित्रपटासाठी मुख्य भूमिका मिळवण्यासाठी ऐश्वर्यचा एक व्हिडिओ पाहून अनुराग कश्यप प्रभावित झाले, ज्यात तो ‘शूल’ चित्रपटातील इरफान खान आणि मनोज वाजपेयी यांचा मोनोलॉग सहजतेने सादर करत होता. ऐश्वर्यने अभिनयाव्यतिरिक्त संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे.

‘निशांची’ हा चित्रपट कुटुंब, प्रेम आणि भावनिक संघर्ष यांचा संगम आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना भावनिक आणि रंगीबेरंगी अनुभव मिळणार आहे.

read also :https://ajinkyabharat.com/shivbhojan-plan-was-crisis/