उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. भाजप खासदार अनिल बलुनी यांचा जीव एका मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात वाचला आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून आपला थरारक अनुभव कथन केला आहे.
भूस्खलनाच्या घटनेत डोळ्यांसमोरच संपूर्ण डोंगर कोसळले; सुदैवाने अनिल बलुनीला काहीही दुखापत झाली नाही. त्यांच्या मते जर थोडेसेही सरकले असते, तर परिस्थिती गंभीर झाली असती. हा व्हिडीओ पाहून अनेक नागरिक हादरले आहेत.
यावर्षी उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली असून, देहरादून आणि चमोलीसह अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. चमोली जिल्ह्यातील नंदनगर घाट परिसरात १० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनास्थळी प्रशासनाचे तात्काळ बचाव कार्य सुरू असल्याचे सांगितले आणि लोकांच्या सुरक्षिततेसाठी सतत लक्ष ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.
भूस्खलनामुळे रस्त्यांवर वाहने अडचणीत आल्याचे व्हिडीओत दिसून आले असून, प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. अनिल बलुनी यांनी या प्रसंगी स्थानिक प्रशासन, एनडीआरएफ-एसडीआरएफच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना व्यक्त केली आहे.
read also :https://ajinkyabharat.com/panand-rastyana-manzuri/#google_vignette