ओबीसी आरक्षण वाचवा, बंजारा समाजाला आवाहन

ओबीसी

लक्ष्मण हाकेचा इशारा: “दांडकं नाही तर कोयते काढू”

हिंगोली : मराठा आरक्षणाचा काढलेला जीआर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का देणारा असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर ओबीसींचा एल्गार मोर्चा काढताना हाके यांनी म्हटले,

“आमच्या हक्काचं आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातो आहे. आता हातामध्ये दांडकं नाही तर कोयते घेऊ.”

हाके यांनी बंजारा समाजाला आवाहन केले की, वेगळं आरक्षण मागण्यापेक्षा ओबीसींची एकजूट राखावी, आणि ओबीसींमध्ये फूट पडणारी कोणतीही कृती टाळावी.

ओबीसी आरक्षणासाठी विद्रोह:

हाके म्हणाले की, मुख्यमंत्री यांनी हा जीआर मागे घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. ओबीसी आरक्षणासाठी हा विद्रोह आहे.

एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक:

हैदराबाद गॅझेटनुसार, बंजारा समाज एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी सक्रिय झाला आहे. जळगाव आणि अकोल्यात हजारो बंजारा स्त्री-पुरुष मोर्चात सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषेत आंदोलन करत त्यांनी आदिवासी आरक्षण न मिळाल्यास मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

एकजूट राखण्याचा इशारा:

हाके म्हणाले,

“एसटी आरक्षण कधी मिळेल हे निश्चित नाही, पण तोपर्यंत आपल्या हक्काचं आरक्षण संपलेलं असेल. एकट्याने मागणी करणे याचा काळ नाही; सगळ्यांनी मिळून आरक्षण वाचवणे आवश्यक आहे.”

read also : https://ajinkyabharat.com/meenatai-thackeray-putyawar-rangfaik-case/