मोदीजींविरुद्ध टीका करणं गैर – फुंडकर

मोदीजींविरुद्ध

मुंबई – सामनाच्या अग्रलेखात “नरेंद्र मोदी हे आमचे वैयक्तिक शत्रू नसून महाराष्ट्राचे शत्रू आहेत” असे विधान केल्यावर राज्याचे कामगार मंत्री व अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.पालकमंत्री फुंडकर यांनी सांगितले, “सामनाच्या मेंदूवर काहीतरी परिणाम झाल्यामुळे अशा प्रकारची लेखणी वापरली जात आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या विषयी अशा प्रकारची वागणूक ही केवळ घृणास्पद आहे आणि स्वीकारार्ह नाही.” त्यांनी स्पष्ट केले की, देशाचे पंतप्रधान असलेल्या मोदींविरुद्ध अशा अपमानजनक विधानाची कोणतीही आवश्यकता नाही.याबरोबरच,  मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकून विटंबना केल्याच्या घटनेवरही फुंडकर यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले, “पुतळे बसवण्याची मागणी सर्व स्तरांवरून केली जाते, परंतु त्यांची योग्य देखरेख करण्यासाठी आणि सांभाळण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. पुतळ्यांचा अपमान करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देणे गरजेचे आहे.”या दोन्ही घटनांमुळे राज्यात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत. सामनाच्या अग्रलेखावरून आणि पुतळ्यावर होणाऱ्या विटंबनाच्या घटनेवरून सामाजिक आणि राजकीय वाद अधिकच गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे विश्लेषक सांगत आहेत.

read also : https://ajinkyabharat.com/debt-vasuli-protest-motha-janakrosh-morcha/

Related News